काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १०-१० जागा निवडून येतील – मोदी

0
537

जालना, दि. १६ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळ्यातील दहा काट्यावर एक मोठा भाऊ ऊभा आहे, तर छोटा भाऊ दुसऱ्या दहाच्या काट्यावर उभा आहे. म्हणजेच मोठा भाऊ दहा जागा आणणार व छोटा भाऊ दहा जागा आणणार हे त्यांच्याच घड्याळाने दाखवून दिले आहे. यापेक्षा जास्त काही होण्याची शक्यता नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली .

परतुर येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला मराठवाड्याने तीन मुख्यमंत्री दिल्यानंतरही मराठवाड्यातील परीस्थितीत काहीही बदल झालेला नाही. रस्ते, पाणी, दवाखाने, वीज या सगळ्या पायाभूत सुविधांसाठी येथील लोकांना तडफडत राहावे लागले. मराठवाड्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा परीसर असताना येथील विकास गेला कुठे? असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला.

त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळासोबत भाजपच्या एकाच मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाची तुलना करण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. मराठवाड्याच्या नावाने विकासाच्या योजना तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे नातेवाईक आणि चेलाचपाट्यांची घरे भरली. या सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण साफ करण्याचे आवाहन  मोदी यांनी केले.