अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर ठाम; काँग्रेसमध्ये फेरचना करण्यासाठी सर्व राज्यातील समित्या बरखास्त

0
391

नवी दिल्ली, दि, २४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कॉंग्रेस पक्षात बदल करण्यात येत आहेत. पक्षात फेररचना करण्यासाठी सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुका असल्याने काँग्रेसला तातडीने फेररचना करत नवी संघटना उभी करावी लागणार आहे.

राहुल गांधी आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याने कॉंग्रेसचे अध्यक्ष पद कोणाकडे दयायचे याबाबत कॉंग्रेसमध्ये नेत्यांची चाचपणी चालू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्बत होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण, सुशिलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि सचिन पायलट यांची नावं देखील चर्चेत आहेत.

दरम्यान राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष विधानसभेसाठी कशापध्तीने संघटना उभी करणार याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने राज्यातील समिती बरखास्त केली आहे. त्यामुळे तातडीने फेररचना करत नवी संघटना उभी करावी लागणार आहे.