काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत ?

0
501

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ  क्लिप व्हायरल झाली आहे.  याबाबत चव्हाण यांनी खुलासा करताना म्हटले आहे की,  कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे आमचे काम आहे, मी क्लिप ऐकलेली नाही. 

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडीओ  क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना अशोक चव्हाण   मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे बोलल्याचा संवाद  ऐकू येत आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, खाजगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे अंतर्गत  विषय आहेत. चंद्रपूरमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत, कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे माझे काम आहे.  मी क्लिप ऐकलेली नाही, चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय आहेत. कार्यकर्ते नाराज आहेत, असेही ते म्हणाले.