कळसुबाई शिखरावर गरवारे निसर्ग प्रेमी ग्रुपचा यशस्वी ट्रेक…!

0
855

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – धुवांधार पाऊस, प्रचंड वारा, धुक्याची चादर, व  निसरट वाटा, या सगळ्याचा सामना करीत गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने ५४०० फूट उंचीवरील कळसुबाई शिखरावर “मैत्री-दिन” साजरा केला. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, उंचावरून कोसळणारे धबधबे, ऊन पाऊस व धुके यातून आकाशाशी स्पर्धा करणारे कळसुबाईचे उंच शिखर मावळ्यांना खुणावत होते. या सगळ्याचा आनंद घेत या ग्रुपने चार तासाच्या अखंड चढाईनंतर शिखरावर पाऊले ठेवले.

‌नेहमीच वेगवेगळी ध्येय गाठण्याचा या ग्रुपचा संकल्प असतो यावेळी या ग्रुपने..”गरवारे टेक्निकल फायबर” या नवीनच नामांतर झालेल्या आपल्या कंपनीचे नाव “जगातील उंच एव्हरेस्ट शिखरावर घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे.  त्याचाच एक भाग म्हणून या ग्रुपने टाकलेले हे “पहिलं पाऊलं”

“गरवारे टेक्निकल फायबर” या कंपनीचे चेअरमन  वायुसाहेब गरवारे नेहमीच आपल्या  कर्मचाऱ्यांचा उल्लेख आपण सर्वजण  एक फॅमिली मेंबर आहोत, असा करीत असतात. त्यांची प्रत्येक नवीन संकल्पना सगळ्यांच्याकरिता एक आव्हान असते. व त्यासाठी कंपनीतील प्रत्येकजण टीमवर्कनी काम करून ती पूर्णत्वास नेत असतो.

आज गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या सदस्यांना मनापासून आनंद होत आहे की आम्ही आमचं पहिलं पाऊलं सह्याद्रीच्या सर्वात उंच शिखरावर ठेवण्यात यशस्वी झालो. याच टीम वर्कनी काम करून आम्ही नवनवीन आव्हान नक्कीच साध्य करू व “गरवारे टेक्निकल फायबर” हे नाव जगभर पोहचवू, असा मनोदय ग्रुपने यावेळी व्यक्त केला.

या मोहिमेकरिता व्यवस्थापन अधिकारी प्रबोध कामत, राजेंद्र शिवराईकर, सुधीर राणे व विलास आरेकर यांनी  सहकार्य व मार्गदर्शन केले. या ट्रेकिंग ग्रुपमध्ये शाम कुंभार, माधव ढमाले, संजय खोत, संजय पाटील, सतीश तारू, आण्णा पाटील, सुयश पाटील, निखिल, प्रज्ञा, मेघा व पूनम यांनी सहभाग घेतला.