कल्याण मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

0
247

देहू, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने हवेली तालुक्यातील येलवाडी येथे सुरु असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी 10 हजार 665 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महावीर रामदास वाकडे (वय 30, रा. येलवाडी. मूळ रा. उस्मानाबाद), अरविंद रामनरेश कुमार (वय 29, रा. देहूगाव. मूळ रा. उत्तर प्रदेश), संदीप रंगनाथ आढाव (वय 34, रा. माळवाडी, देहूगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई योगेश बालाजी तिडके यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी येलवाडी येथील संत भागीरथीमाता चौकाजवळ उघड्या जागेत कल्याण कल्याण मटका नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता सामाजिक सुरक्षा विभागाने मटका अड्ड्यावर छापा मारला.

मटका, बुक, कार्बन, पेन, रोख रक्कम असा एकूण 10 हजार 665 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.