कर्जमाफीचा दुसरा टप्पाही उद्धव ठाकरे लवकरच जाहीर करतील – बच्चू कडू

0
446

नागपूर,दि.२४(पीसीबी) – तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे बर्‍याच अडचणी आल्या होत्या. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात सूचना दिल्या, असं मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना, दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असंही कडूंनी सांगितलं आहे.