आम्ही मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करू – डोनाल्ड ट्रम्प

0
342

अहमदाबाद,दि.२४(पीसीबी) – आम्ही मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करू, पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेत, आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याचा अधिकार प्रत्येक देशाला, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सांगितलं आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमच्या मंचावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिलाय.

भारताबरोबरचे संरक्षणसंबंध आम्ही बळकट करणार आहोत. आम्ही उत्तम शस्त्रांची निर्मिती करतोय आणि भारताबरोबर आमचा व्यापार सुरु असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तसेच आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. घुसखोरांपासून सीमा सुरक्षित करण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे. इस्लामिक दहशतवादापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. आम्ही आज इसिसला १०० टक्के संपवले असून आयसीसचा म्होरक्या अल बगदादीला ठार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, अहमदाबादमधील मोटेरा या जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान मोदींनी भव्य स्वागत केलं. यावेळी स्टेडियमवर दोन लाखाहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि भारताचं तोंडभरुन कौतुक केलं.