करोना व्हायरसचा धसका यंदाचे वर्ष होळी साजरा न करण्याचा सेलिब्रेटींचा निर्णय

0
682
मुंबई, दि.६ (पीसीबी) – शिवाजी पार्क किंवा वांद्रे येथे आळीपाळीने रंगकर्मींच्या या धमाकेदार धुळवडीचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्ष मात्र करोना व्हायरसचा धसका या कलाकार मंडळींनी घेतला असून या वर्षीचे धुळवड सेलिब्रेशन रद्द करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमिकर व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जमाव करायचा नाही. एकाच जागेवर लोकांनी एकत्र यायचे नाही, असे आवाहन जगभरातील आरोग्य तज्ज्ञाकंडून करण्यात आलेय. भारतातही करोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींची होळीच्या पार्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अवधूत गुप्ते, श्रीरंग गोडबोले, अभिजीत पानसे, जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, अवधूत-मंदार वाडकर, अमेय खोपकर आदींच्या पुढाकारानं स्थापन झालेला ‘रंगकर्मी’ मोठ्या उत्साहाने हा ग्रुप या धुळवडीचे आयोजन करत असतो.
सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी ‘महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.