“करोना काय फक्त रात्री फिरतो का? मग नाईट कर्फ्यू कशासाठी?”; विरोधकांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

0
273

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : ठाकरे सरकारने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचा निर्णय सुनावल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खळबळ माजली. आणि खबरदारी म्हणून मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र ‘करोना काय फक्त रात्री फिरतो का?’ असा सवाल विरोधक विचारत आहे. आता ठाकरेंनी विरोधकांना चांगलच उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले कि, “दोन दिवसांपासून संचारबंदी सुरु असून अनेकजण करोना रात्री मोकाट फिरतो आणि दिवसा घऱात बसतो का? अशी विचारणा करत आहेत. तसं नाहीये….जनतेला थोडीशी जाणीव करुन द्यायची गरज असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे. दिवसा आपण लॉकडाउन करु शकत नाही. तशी वेळही येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. अनावश्यक गर्दी टाळणं हे जास्त महत्वाचं आहे”. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६पर्यंत संचारबंदी लागू केल्याने नाताळच्या आणि नववर्षाच्या सवगतच्या उत्साहावर विरजण पडले आहे.