कंटेनरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू

0
248

देहूरोड, दि. २६ ९पीसीबी) – कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्यातच मृत्युमुखी पडला. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी साडेआठ वाजता सेन्ट्रल चौक, देहूरोड येथे घडली.

सोमनाथ जयवंत पडवळ (वय 30, रा. महागाव, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याबाबत साईनाथ जयवंत पडवळ (वय 34, रा. डांगे चौक, ताथवडे गाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक छोटेलाल रवींद्र प्रसाद (वय 23, रा. नाशिक फाटा कासारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईनाथ यांचा मयत भाऊ सोमनाथ शनिवारी सकाळी साडेआठ वाजता दुचाकीवरून (एम एच 14 / बी एच 8472) कामावर जात होता. सेन्ट्रल चौक, देहूरोड येथे आल्यानंतर एका कंटेनरने (एम एच 12 / एल टी 7402) सोमनाथ याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सोमनाथ गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.