महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

0
344

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने विचारले असता विनयभंग करणा-या व्यक्तीने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 25) दुपारी पाच वाजता गांधीनगर, पिंपरी येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बबन अजिनाथ ओव्हल (वय 52, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत महिलेने रविवारी (दि. 25) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला पतीसोबत घरी जात असताना आरोपी बबन गाडीवरून आला. त्याने पिडीत महिलेकडे एकटक बघत तिचा विनयभंग केला. याबाबत पतीने बबन याला विचारणा केली असता बबन याने पतीला शिवीगाळ करून ‘मी तुला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर बबन निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.