कंगना राणावत भाजपची भावी राज्यसभा खासदार ?

0
210

– खासदार नवनीत राणा यांना ड्रामा क्विन – खासदार इम्तियाज जलील
पुणे, दि. १९ (पीसीबी) – कंगना राणावत भाजपची भावी राज्यसभा खासदार असल्याचे भाकित खासदार इम्तियाज जलील यांनी वर्तवले आहे. दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना ड्रामा क्विन असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या सरकारनामा ओपन माईकच्या ‘फेसऑफ’मध्ये जलील बोलत होते. यावेळी राज्याच्या उद्योग, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार इम्तियाज जलील, श्रीकांत शिंदे, आमदार धीरज देशमुख, परिणय फुके आदी उपस्थित होते. फेसऑफमध्ये ही राजकीय मंडळी विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा छायाचित्र पाहून बोलत होते. जलील पुढे म्हणाले, राम कदम म्हणजे बडबड. जगाच्या बाहेरील प्रश्न जरी असला तरी त्याचे उत्तर त्यांच्याकडे राहिल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा पाहून जलील आवाक् झाले. अरे बाप रे ! मी घाबरलो.. ईडी, असे म्हणत त्यांनी शहा यांना टोला लगावला आहे.
विजय मल्ल्या शो मॅन. कंगना राणावत यांचा चेहरा पाहून जलील म्हणाले, भाजपची पुढील राज्यसभा खासदार. अनिल देशमुख- १०० कोटींचा आकडा त्यांना आठवला. शशी थरुर म्हणजे जिकडे गुळ तिकडे माशी, अशी टीका त्यांनी केली. व्लादिमिर पुतीन हे जगासाठी धोकादायक माणूस असल्याचे ते म्हणाले. शरद पवार जे बोलतात, ते करत नाही, मात्र जे करतात ते बोलून दाखवत नाही, अशा शद्बांत जलील यांनी पवार यांची फिरकी घेतली. कितीही महाराष्ट्रात करा मात्र ना ना.. ना होणार असे म्हणत त्यांनी नाना पटोले यांची खिल्ली उडवली. नवनीत राणा.. त्या माझ्या बरोबरच असतात. मी काही बोललो तर वाद होईल. त्या ड्रामा क्विन असल्याचे जलील म्हणाले.

कोरोनाची दोन वर्ष झाली. आता खूप झालं. महेश मांजरेकर – चांगला डिरेक्टर आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतो’ हा चित्रपट आवडत असल्याचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. चिन्मय मांडलेकर हा जबरदस्त अभिनेता आहे. बिचकुलेंवर काय बोलावे, असा सवाल त्यांनी केला. रामदास आठवले – गो कोरोना ही कविता आठवत असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे सगळ्यांसाठी हिंदू हृदयसम्राट आणि आमच्यासाठी दैवत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे पाहून आपले बारा थांबवून ठेवले ना, असे म्हणाले. ईडीचे चित्र पाहून काय ओ नेक्स्ट नंबर कोणाचा आहे?, असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप आमदार परिणय फुके यांना केला. किम ऊन जोंग म्हणजे पुतीन यांची छोटी आवृत्ती. नरेंद्र मोदींचे छायाचित्र पाहून पंधरा लाख कधी येणार ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.