कंगना ने पत्रकारांना पाठवली कायदेशीर नोटीस; जर्नलिस्टिक नॉर्मसचे उल्लंघन केल्याचा केला आरोप

0
385

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – ‘जजमेंटल है क्या’या चित्रटाच्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री कंगना रणौत आणि काही पत्रकारांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर हा वाद चांगलाच पेटला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर आता कंगनाच्या वकिलांनी या पत्रकारांविरोधात मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘जजमेंटल है क्या’या चित्रपटाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कंगनाची एका पत्रकारासोबत शाब्दीक बाचाबाची झाली. कंगनाच्या या वर्तनामुळे चित्रपटाचे निर्माते बालाजी फिल्मने एक पत्रक प्रसिद्ध करत माफी मागितली. मात्र कंगना आणि तिची बहिण रंगोलीने आक्रमक भूमिका घेतली आहे. रंगोलीने ट्विटरच्या माध्यमातून या पत्रकारांना देशद्रोही म्हटले होते. तर आता कंगनाच्या वकिलांनी या पत्रकारांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

ज्यामध्ये‘काही पत्रकार त्याच्या जर्नलिस्टिक नॉर्मसचे उल्लंघन करत आहेत, गुन्हेगारीची कृत्य करत आहेत. तसेच हे पत्रकार माझ्या क्लायंटची सार्वजनिक ठिकणी मानहानी करत असून तिला त्रास देत आहेत’, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.