औरंगाबादमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर; BMW विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

0
465

औरंगाबाद, दि.१ (पीसीबी) – औरंगाबादमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोटं लागले आहे.  औरंगाबादजवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्यासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मद्यप्राशन करुन परतताना BMW विहिरीत पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबादमधील घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सौरभ विजय नांदुरकर (वय २९), वीरभास मुकुंद कस्तुरे (वय ३४) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर नितीन रवींद्र शिरशीकर, प्रतीक गिरीश कापडिया व  मधुर प्रवीण जयस्वाल अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

अपघातातमधील पाचही जण औरंगाबादमधील रोकडा हनुमान कॉलनीमधील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. एमएच २० इएफ ०७०७ या क्रमांकाच्या BMWने पाचही जण मध्यपान करून निघाले होते.