वडिलांनी PubG डिलीट केल्याने तरुणीने फोडला हंबरडा ..पहा व्हिडीओ

0
669

मुंबई, दि.१ (पीसीबी) – मोबाईल आणि त्यावरच्या गेमचं वेड हे आता काही नवं राहिलं नाही. या वेडाचं रुपांतर आता व्यसनात झालं असून त्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे याचं किती वेड लागलंय हे लक्षात येतं. हे होत असतानाच आणखी एक व्हिडीओ आज व्हायरल झालाय. अभ्यास सोडून मोबाईलमध्ये व्यस्त राहणाऱ्या तरुणीला वळण लावण्यासाठी तिच्या वडिलांनी तिच्या फोनमधून PubG हा गेमच डिलीट केल्याने तिने हंबरडा फोडला आणि ती रडायला लागली. मेरे PubG…मेरे PubG असे म्हणत धाय मोकलून ती रडायला लागली.

तो व्हिडीओ १ जीबीचा होता. आता पुन्हा तो Install होणार नाही. मेरे PubG असे म्हणत ती जोर जोरात रडू लगाली. १ जीबी जागा झाल्यामुळे तुझा मोबाईल आता आणखी चांगला चालेल असे म्हणताच ती पुन्हा जोरात रडायला लागली.