पंढरपूर : आजपासून विठ्ठल मंदिरात मोबाईलला बंदी

0
885

पंढरपूर, दि.१ (पीसीबी) – नवीन वर्षाची सुरवात परमात्मा पांडुरंगाच्या पदस्पर्श दर्शनाने व्हावे यासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. नवीन वर्षाची सुरवात म्हणून मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभार्यात आकर्षक अशा ब्ल्यू डायमंड नावाच्या फुलांनी आरास केली आहे. या फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले आहे. दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने एक जानेवारी पासून मंदिरात मोबाईल बंदीचा निणर्य घेतला आहे. या करीता समितीने स्वतंत्र लॉकरची व्यव्यस्था केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठ्ल जोशी यांनी दिली आहे.

दरम्यान ,मंदिर समितीने एक जानेवारी पासून मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मंदिरात आल्यावर भाविक देवाचे,मंदिरात फोटो काढणे,मोबैल्व्र बोलणे या सारखे प्रक्रार होऊ लागले. यामुळे आजपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी नामदेव पायरी जवळील संत ज्ञानेश्वर मंडप येथे ६०० लॉकरची व्यवस्था केली आहे. यासठी नाममात्र दोन रुपये आकारले जाणार आहेत.