ओव्हरटेकच्या नादात दुचाकीची डिव्हाय़डरला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
94

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – समोर जाणाऱ्या डंपर ला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 21 ऑक्टोबर 2023 रोजी महाळुंगे ते स्पायसर चौक रोडवर घडला आहे.

याप्रकरणी ऋषिकेश तुकाराम शिंदे (वय 26 रा. आळंदी) यांनी मंगळवारी (दि.30) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मयत भावेश दिलीप नाहिरे (वय 30 रा. आळंदी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मयत मित्र भावेश हे दुचाकीवरून जात होते. यावेळी भावेश याने रस्त्याच्या परिस्थीतीचा विचार न करता त्याच्या ताब्यातील दुचाकी वेगाने चालवील. यावेळी तो पुढे जाणाऱ्या डंपरा ओव्हरटेक करत होते. मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात भावेश गंभीर जखमी झाला व यातच त्याचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.