ओला उबरप्रमाणे, हमालांचीही बुकींग सुद्धा मोबाईल अॅपने होणार

0
495

मुंबई, दि, २५ (पीसीबी) – रेल्वे स्थानकांमध्ये हमालाकडून अवाच्यासवा पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी वरुन मध्य रेल्वेने ओला उबरप्रमाणे आता हमालांचीही बुकींगसाठी अँपच्या वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अँपचे ‘यात्री’ असे अॅपचं नाव असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये एकूण ३०० हमाल असून त्या सर्वांना या अॅपशी जोडले जाणार आहे.

लांबच्या प्रवासाला जाणारे प्रवासी जादा समान घेऊन जातात. रेल्वे स्थानकात सामानाचं दरपत्रकही लावण्यात आलेलं असताना अनेक हमाल मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून शुल्क आकारतात. अनेकदा शुल्क आकारणीवरून प्रवाशांशी हुज्जतही घालतात. त्याबाबतच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेकदा हमाल म्हणून नोंद नसतानाही अनेक बाहेरची मुलं सामान वाहून नेण्याचं काम करतात. त्यामुळे प्रत्येक हमालाला बायोमॅट्रीक कार्ड देण्यात येणार आहे. केवळ नोंदणीकृत हमालांनाच हे काम मिळावं म्हणून हे कार्ड देण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. ओला-उबरच्या धर्तीवरच हे अॅप तयार करण्यात येणार आहे. त्यात सामान कुठपर्यंत वाहून न्यायचं, त्याची संख्या आणि वजन याबाबतची माहिती विचारून शुल्क आकारण्यात येणार आहे.