दहा रुपयांसाठी भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा चाकूने भोसकून खून

0
412

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – दहा रुपयांच्या भाजीच्या वादातून एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा चाकूने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना मुंबईतील दादर या रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी (दि.२४) रात्री अकराच्या सुमारास घडली.

मोहम्मद हनीफ असे मृत इसमाचे नाव आहे. तर सोनीलाल असे आरोपी भाजी विक्रेत्याचे नाव असून तो सध्या फरार आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास भाजी विक्रेता सोनीलाल आणि ग्राहक मोहम्मद यांच्यामध्ये भाजीच्या पैशांवरुन वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि सोनीलालने धारदार चाकूने भोसकून मोहम्मदचा खून केला. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या सोनीलाल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.