ओडिशा आणि पश्चिम बंगालचे निकाल धक्कादायक असतील – अरूण जेटली

0
463

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांतल्या मतदानाकडे पाहता जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींना कौल देत असल्याचे चित्र आहे. यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. मोदी सरकारविरोधात विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराला मतदार भुललेले नाहीत, असे निरीक्षण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोंदवले आहे.

या निवडणुकीत ईशान्य, प. बंगाल आणि ओडिशाचे निकाल धक्कादायक असतील, असा दावा जेटली यांनी केला आहे. जेटली यांनी यासंदर्भात एट ट्विट केले आहे. त्यांनी लिहिलंय की, ‘भारत आता राजकीय अस्थिरतेची परिस्थिती मागे टाकत भाजपला पूर्ण बहुमत देण्याच्या मार्गावर आहे.

भाजपचे मीडिया प्रभारी आणि राज्यसभा खासदार अनिल बलुनी यांनी देखील भाजपला प. बंगालमध्ये गुरुवारी ज्या पाच जागांसाठी मतदान झाले, त्यापैकी चार जागा मिळतील असा दावा केला आहे.