आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा ‘हा’ पहिला भारतीय

0
511
Generated by IJG JPEG Library

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – फिरकीनं दिग्गज फलंदाजांची गिरकी घेणारा दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज अमित मिश्रा आयपीएल कारकिर्दीत १५० गडी बाद करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. मिश्रानं  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्रिफळाचित करत हा पराक्रम केला आहे. रोहितला त्यानं सहाव्यांदा बाद केलं आहे.

आयपीएलमधील १४० वा सामना खेळणाऱ्या ३६ वर्षीय अमित मिश्रानं गुरुवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर आपल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. रोहित शर्मानं याच सामन्यात टी-२० कारकिर्दीत तब्बल ८००० धावा पूर्ण केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाज बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये लसिथ मलिंगा आघाडीवर आहे. त्यानं ११४ सामन्यांत १६१ गडी बाद केले आहेत. मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या स्थानी कोलकाताकडून खेळणारा पियूष चावला आहे. चावलानं १५२ सामन्यांत १४६ फलंदाजांना तंबूत धाडलं आहे.