ऑस्ट्रेलियाबाबत फेसबुकने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0
293

– न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला घातली बंदी

सिडनी, दि. १८ (पीसीबी) : ऑस्ट्रेलियात फेसबुकने आपल्या माध्यमातून न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला बंदी घेतली आहे. सध्या फेसबुकचे ऑस्ट्रेलियातील मीडिया लॉ वरून सरकारशी संघर्ष सुरू आहे. हे प्रकरण एवढं वाढलं की, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने आपले पेज देखील बंद केले आहे.

या प्रकरणावर फेसबुकचे म्हणणे आहे की, त्यांनी मीडिया लॉ च्या विरुद्ध पाऊल उचलले आहे. बंदीनंतर ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस, हवामानाशी संबधित माहिती देणारे पेज, सरकारी कार्यालये, वेगवेगळ्याच्या विभागा, इतर आप्त्कालीन पेज बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

नव्या मीडीया लॉ विरोधात ही बंदी घातली जात असल्याचे फेसबुकने म्हटले. या कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत.फेसबुकच्या या बंदीचा फटका अनेक वृत्तसंकेत स्थळांना बसला आहे.ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असलेल्यांना फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातमी वाचता येत नाहीये. हवामान किंवा इतर सेवांशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी ट्विटरचा आणि विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील काही मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली होती. वादग्रस्त मीडिया लॉ वरून गूगलने देखील ऑस्ट्रेलियात आपले सर्च इंजीन बंद करण्याची धमकी दिली होती.