अधिवेशनाला वादळी वळण ,शिवसेना आणि भाजप आमदारांची सभागृहात हाणामारी

0
719

नागपूर, दि.१७ (पीसीबी) – विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार राडेबाजी  पाहायला मिळत आहे भाजपा आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर घेऊन आले. तेव्हा शिवसेना आमदार गायकवाड आणि अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाला.ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्ती केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले.

भाजपच्या काही आमदारांनी आमदारांनी सावरकरांसंबंधित बॅनर्स सभागृहात आणले होते. सभागृहात अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यास परवानगी नसते. असं असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात बॅनर झळकावल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा आमदारांचं विधानसभा अध्यक्ष निलंबनही करू शकतात.