एसपी पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या सीईओंना देखील कोरोनाची लागण

0
245

रत्नागिरी, दि. ३ (पीसीबी) –  रत्नागिरी जिल्ह्याच्या एसपींना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या सीईओंना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काल संध्याकाळी याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता सीईओंना होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब देखील आता तपासाणीकरता घेतले जाणार आहेत.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 683वर पोहोचाला आहे. तर, जिल्हाधिकारी .यांचे स्वॅब देखील काल तपासणीकरता घेतले होते ते निगेटीव्ह आल्याची माहिती आता समोर येत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता 8 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, जिल्ह्यातील दोन बडे अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्यानं आता आरोग्य यंत्रणा देखील आणखी सतर्क झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 हजार 967 नमुने तपासणीकरता घेण्यात आले असून 9 हजार 808 अहवाल प्राप्त झाले आहेत. तर, 159 अहवाल प्रलंबित आहेत.