मी कधी निवृत्त होणार हे मला सुद्धा माहित नाही- एम.एस धोनी

0
358

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्यापेक्षा भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. धोनी चौथा वर्ल्डकप खेळत असून ही त्याची शेवटची स्पर्धा आहे असा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे.

या दरम्यान एका पत्रकारने  धोनीला गाठून त्याला थेट निवृत्तीसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर धोनीने त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये मी कधी निवृत्त होणार हे मला सुद्धा माहित नाही असे उत्तर दिले. मी कधी निवृत्त होणार हे मला सुद्धा माहित नाही. पण उद्याच्या सामन्याआधी मी निवृत्त व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे असे धोनी म्हणाल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

धोनीने या विधानामधून भारतीय संघ किंवा व्यवस्थापनावर निशाणा साधलेला नाही. प्रसारमाध्यमात सतत त्याच्या निवृत्तीची चर्चा करणाऱ्यांवर धोनीने अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे वृत्त वाहिनीने म्हटले आहे.