एम्पायर स्क्वेअरमधील ज्येष्ठांना कोरोना प्रतिबंधक लसीचा ‘बुस्टर’ डोस…

0
410

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या पुढारातून मोरवाडी चिंचवड प्रभाग क्रमांक 10 मधील एम्पायर स्क्वेअर गृहनिर्माण सोसायटी मधील जेष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यात आला. तर, 15 ते 18 या वयोगटातील मुलांचेही लसीकरण करण्यात आले.

भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या हस्ते फीत कापून लसीकरण चालू झाले. वायसीएम हॉस्पिटलच्या मदतीने हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. डॉ. अमिता भट्टड, नर्स जयश्री मिडगुले, करुणा समुद्रे, प्रणाली तेलगोटे, वैष्णवी सरोदे, अलका भणगे यांनी लस टोचविली.

एम्पायर स्क्वेअर जेष्ठ नागरिक संघातर्फे प्रा. सदानंद बोगम, सुवालाल मुथ्था, नेमिचंद जैन, सुशीलकुमार गोयल, विजय गुप्ता, प्रदीप तळेकर, विलायतीराम आगरवाल, रामकुमार आगरवाल, शंभूशेठ तोडी, जगन्नाथ तरटे, तुकाराम शेळके, मधुकर जोशी, अतुल शहा, शेखर घेवारे, विनीत कदम, अजय लड्डा, सुशीलकुमार गोएल व इतर सर्व जेष्ठ नागरिकांनी लसीकरण मोहिम यशस्वी पार पडण्यासाठी काम केले.