शिवरायांना मानवंदना देण्यासाठी 8 मुली तिकोना किल्ला ते बर्ड व्हॅली पर्यंत 44 किलोमीटर धावणार..

0
368

चिंचवड स्टेशन, दि. ३१ (पीसीबी) – शिवरायांना मानवंदना देण्यासाठी 8 शिवकन्या पेटती मशाल घेऊन तिकोना किल्ला ते बर्ड व्हॅली गार्डन पर्यंत 44 किलोमीटर धावणार आहेत. 29 जानेवारी रोजी 10 °© तापमान असताना या मुलींनी तिकोना किल्ला येथून बर्ड व्हॅली गार्डन पर्यंत 44 किलोमीटर धावण्याचा सराव केला.

दरवर्षी शिवजयंती निमित्त शिवरायांना मानवंदना देऊन पेटती मशाल मुले किंवा पुरुषमंडळी घेऊन येतात, असे आपण पाहत आलोय. तर, यावर्षी कराटे टीम, कराटे क्लासच्या मुली मशाल घेऊन येणार आहेत. त्याची पूर्व तयारी, रंगीत तालीम केली. 29 जानेवारी रोजी USKA मोरेवस्ती कराटे शाखेमधील 8 मुली एकत्र आल्या. त्यात वृदुला पवार , श्वेता लिमन, भक्ती दहिफळे, सानिका माने,मधुरी पाटील,नेत्रा ढगे,श्रावणी पाटील,दीप्ती पाटील, या सर्व मुलींनी रात्री 12.15 वाजता 10 °© तापमान असताना तिकोना किल्ला येथून बर्ड व्हॅली गार्डन पर्यंत 44 किलोमीटर धावण्याचा सराव केला.

हा अवघड प्रवास त्या संपूर्ण टीमने यशस्वीपणे पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊमासाहेब यांना मानवंदना देण्यासाठी शिवजयंतीच्या दिवशी ही संपूर्ण टीम तिकोना किल्ल्यावरून रात्री मशाल हाती घेऊन शिवनंदा,ओम साई सोसायटी,मोरेवस्ती पर्यंतचा हा प्रवास पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचीच ही पूर्व तयारी त्यांनी आज यशस्वीपणे नियोजित वेळेत पार पाडली.

यासाठी योगेश ढगे, गुणवंत इंगळे, नर्मदा दहिफळे, कल्पेश धानोकर, रविंद्र पवार, सोनाली पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.