एक्झिट पोल आणि अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रियंका गांधी

0
470

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) –  एक्झिट पोल आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. निकालाच्या दिवशी गुरूवारी  स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा, असे आवाहन काँग्रेस नेत्या  प्रियांका गांधी यांनी  एका ऑडिओ संदेशाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

सातव्या आणि अखेरच्या  टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पुन्हा भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून  समोर आला आहे. यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी हे आवाहन केले आहे.

अफवा आणि एक्झिट पोल पाहून खचून जाऊ नका. तुम्ही हतबल व्हावे, यासाठीच या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही सजग राहा. निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा, दक्ष रहा, असे आवाहन त्यांनी  केले आहे. आपल्या सर्वांना मेहनतीचे फळ निश्चित मिळेल, असा विश्वास प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला आहे.