पुण्यातील ‘बर्गर किंग’चा काचेने भरलेला बर्गर खाल्याने रिक्षाचालक आयसीयूत

0
486

पुणे, दि. २१ (पीसीबी) – फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथील ‘बर्गर किंग’च्या आउलेटमधील काचेचे तुकडे असलेला बर्गर खाल्याने एका रिक्षाचालकाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आहे.

साजित अजमुद्दीन पठाण (वय ३१, रा. वडारवाडी) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात बर्गर किंग डेक्कन एरिया मॅनेजर, स्टोअर मॅनेजर आणि सुपरवायझर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१५ मे) रोजी रिक्षाचालक साजित पठाण हे मित्रांबरोबर फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथील ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खात होते. त्या वेळी अचानक त्यांना खोकला येऊन त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर मित्रांनी पाहिले असता, बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले. काचेचे तुकडे खाल्ल्यामुळे पठाण यांना तोंडात व पोटाच्या अंतर्भागात जखम झाली आहे. मित्रांनी पठाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पठाण यांच्या घरी कोणी नसल्यामुळे त्यांनी उपचार घेतल्यानंतर १९ मे रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.