“एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे अजितदादा नाराज आहेत, अरे पण कशाला ?” – शरद पवार

0
586

मुंबई,दि,२३(पीसीबी) : भाजपातून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.खडसे यांचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं. मात्र, दुसरीकडे खडसे यांच्या प्रवेशावर काही नेते नाराज असल्याची कुजबुज सुरू होती. या चर्चेला शरद पवार यांनी आज पूर्णविराम दिला.

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेला शरद पवार यांनी पूर्णविराम दिला. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा त्यांच्या प्रवेश करण्याच्या निर्णयापासून सुरू झाली होती. यात राज्य मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याची चर्चाही सुरू होती.

मात्र एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण दरम्यान काही गोष्टींचा खुलासा केला. पवार म्हणाले, ”गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काही तरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत. असं आहे की, करोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेटिंलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना करोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही.”

पवारांनी खडसेंच्या पक्षप्रवेशदरम्यान दिलेल्या भाषणामध्ये अजित पाखरं संबंधीची सर्व शाब्दिक कुजबुज उधळून लावत असं काहीही नसल्याचे स्पष्ट केले.