उस्मनाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आणि राजकुमार पाटील यांची पक्षातून हकालपट्टी

0
495

उस्मनाबाद, दि.२८ (पीसीबी) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांनी उमरगा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील (ता. तुळजापूर) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

प्रा. बिराजदार यांनी दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र शुक्रवारी दोघांनाही दिले आहे. त्यात यापुढे पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून निष्कासित केले असून, पक्षाच्या चिन्हाचा व पत्राचा वापर करता येणार नाही. तसे दिसून आल्यास पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.