विवाहीतेचा छळ; सासरकडच्यां विरोधात गुन्हा दाखल

0
728

देहूरोड, दि.२८ (पीसीबी) – लग्नाच्या हुंड्या मध्ये अंगठी आणि गळ्यातली चैन दिली नाही म्हणून सासरकडच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरकडच्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नासिर शेख, अमिना शेख, नौशाद नजिर शेख, यसमिन अमीन शेख, अमीन शेख हे सर्व आरोपी गांधीनगर, देहूरोड येथे राहत असून अद्याप अटक नाही.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय २१ वर्षे) गांधीनगर, देहूरोड येथे राहत असून ३ मार्च २०१९ पासून ते आज पर्यंत लग्नामध्ये माहेर कडील लोकांनी योग्य त्या रितीने पाहूणचार केला नाही आणि हुंड्यामध्ये अंगठी आणि गळ्यातली चैन दिली नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्यामुळे या प्रकरणी फिर्यादीने देहूरोड पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी सासरकडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.