उर्मिला मातोंडकरांची नाराजी दूर; काँग्रेसचा प्रचार करणार  

0
343

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच सक्रीय होतील.  तसेच संजय निरुपम यांचीही समजूत काढली जाईल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.  काँग्रेसमध्ये आता गटबाजी राहिलेली  नाही, मतभेद तर सर्वच पक्षांमध्ये असतात, असेही ते म्हणाले.

उर्मिला मातोंडकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची नाराजी दूर झाली  आहे. त्या लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून सहभागी होतील. मुंबईची स्मार्ट सिटी न होता केवळ शिवसेना आणि भाजपचे नेते स्मार्ट झालेले आहेत.  आरेतील झाडे तोडण्याबद्दल भाजप सरकारच्या विरोधात मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे, असेही गायकवाड यांनी  म्हटले  आहे.

गेली २० वर्षे मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र,  मुंबईकरांच्या मूलभूत नागरी सोयी सुविधांसाठी इतकी तत्परता शिवसेना-भाजप सरकारने कधीच दाखवली नाही, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.