उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी सहकारी कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात

0
516

 

तुळजापूर, दि.२८ (पीसीबी) – कोरोना संसर्गजन्य रोगाच्या वाढणाऱ्या पादुर्भावाचा पार्श्वभुमीवर संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे.

त्यामुळे तुळजापूर शहरातील किरकोळ विक्रेते कुंटुबियांचा व्यवासायही थंडावल्याने त्यांच्यावर या लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, मुख्याधिकारी अशिष लोकरे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी एकवीस दिवस पुरेल इतके रेशन, दोनशे कुटुंबाना कोणताही गजवजा न करता दिले.

हे रेशन घरपोच मिळताच या दोनशे कुंटुबियांनी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे मुख्याधिकारी अशिष लोकरे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. श्री तुळजाभवानी मंदीर परिसरातील रस्त्यावर बसुन छोटेमोठे व्यवसाय करणारे स्ञी व पुरुषांना व्यवसाय करणे शक्य नसल्याने त्यांचा कुंटुबियावर उपासमारीचे संकट ओडावले होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून माणुसकीच्या नात्याने दिलीप टिपरसे, अशिष लोकरे यांनी स्वताचे व आपल्या कर्मचारी वर्गच्या यथाशक्ति मदतीने कुंटुबायांना रेशन देऊन संकटात मदतीचा हात दिला.

नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी घरपोच किराणा मोल पोहचविण्यासाठी उपाययोजना कार्यान्वित केल्या. तसेच माजी नगरसेवक नारायण नन्नवरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चोपदार, नगरसेवक रणजित इंगळे यांनी मास्कचे वाटप केले. सज्जन जाधव यांनी तुळजापूर खुर्द परिसरात औषध फवारणी करून घेतली.