बाहेर पडलेल्या किती जणांना पोलीस थांबावणार – जयंत पाटील

0
466

 

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – जयंत पाटिल यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की,आपल्याला काही होणार नाही असे समजून कोणीही घराबाहेर बाहेर पडू नका. बाहेर पडलेल्या किती जणांना पोलीस थांबावणार. पोलीस देखील एक माणूस आहे. त्यामुळे आपणच घराबाहेर न पडणे योग्य आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले.

‘या दिवसांमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीही बाहेर पडतो त्याच्यासोबत अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी कोण पॉझिटिव्ह आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे घरातच थांबायला हवे,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘पोलिसांवर किती ताण द्यायचा ? घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी राज्यातील जनतेला केले.

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झाली. शेतीविषयक काय उपाययोजना करता येतील यावर आम्ही संवाद साधला. शेतीची काम बंद होऊ नये यावर सर्वांनी लक्ष केंद्रीत केले आहे,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.