उपमहापौर केशव घोळवे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केला निषेध

0
244

पिंपरी, दि.१० (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवकचे प्रमुख पदाधिकारी दुपारी उपमहापौर घोळवे यांच्या दालनात दाखल झाले. घोळवे यांनी मंगळवारी सर्व साधारण सभेत शेतक-यांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी व घोळवे यांनी देशातील शेतक-यांची माफी मागावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर उपमहापौरांच्या खुर्चीस पालेभाज्या व फळांचा हार घालून उपमहापौर केशव घोळवे यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते, निखिल दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे तसेच सनी डहाळे, अक्षय माचरे, अशोक भडकुंबे, मनजितसिंह कोहली, सोनू बोदडे, श्री सोनिगिरा, प्रतिक साळुंखे आदी उपस्थित होते.