पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट संघ जाहीर

0
295

पिंपरी, दि.१० (पीसीबी) राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट पुरुष आणि महिला खुला गटासाठी टेनिस क्रिकेट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड कर्णधारपदी दर्शन रानवडे (पुरुष ) आणि अमिषा पाटील (महिला ) यांची निवड करण्यात आली आहे . पार्वती बाकळे यांची प्रशिक्षक व संतोष बुटना व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे . या राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2020 रोजी तालुका क्रीडा संकुल , नाशिक येथे होणार आहे .

महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट अससोसिएशन यांच्या मान्यतेने राज्य सचिव मीनाक्षी गिरी -जाधव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे .
पिंपरी चिंचवड महिलांच्या संघात अमिषा पाटील (कर्णधार ) , अनुजा मोरे (उपकर्णधार ) , अंकिता शेळके , श्रद्धा आव्हाड , अपूर्वा काजळे , तन्वी परदेशी , नेहा आहेर , मधुरा बाफना , श्रुतिका काकडे , सलोनी काळे , सिमरन ठाकूर .
मुलांच्या संघात दर्शन रानवडे (कर्णधार ) , रितेश राठोड (उपकर्णधार ), साहिल गवारे , रेहान शेख , जय धारस्कर , सोहम भगत , तनिष्क व्हनमाने , सुबोध कांबळे , रुणाल गवारे , आदर्श सोनावणे , राहुल शेळके , यश सूर्यवंशी , स्वप्नील खोडदे , श्रीयश पिंगळे , हिमांशू डागा या सर्वांची निवड झालेली माहिती संघटनचे पदाधिकारी मृदुला महाजन , सुनीता फडके आणि ऐश्वर्या साठे ह्यानी दिली .