“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे गरजेचे” म्हणणाऱ्या पोस्टरवर कारवाई

0
510

मुंबई,दि.१३(पीसीबी) – मुंबईतील कलानगर, वांद्रे परिसरात “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे गरजेचे” अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते. आता या बॅनरविरोधात बृहनमुंबई महानगरपालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.

ही बॅनर आता हटवण्यात आली आहेत. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर अशा आशयाची बॅनर लावण्यात आली होती.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘महाशिवआघाडी’त सत्तेच्या वाटाघाटीसाठी जोरदार हालचाली सुरू असुन, काल रात्री पत्रकार परिषद आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यात वांद्रेतल्या हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.