काँग्रेससोबतची चर्चा योग्य दिशेने, निर्णय लवकरच – उद्धव ठाकरे

0
546

मुंबई,दि.१३(पीसीबी) : काँग्रेससोबत बैठक झाली, चर्चा योग्य दिशेने सुरु आहे, निर्णय लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली. काँग्रेस नेत्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होती. ५५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.

किमान समान कार्यक्रम असावा असं काँग्रेस-राष्ट्रवादीने पूर्वीपासूनच म्हटलं आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी समन्वय समितीसाठी ५-५ जणांची नावं निश्चित केली आहेत.

याशिवाय मंत्रिपदांचं वाटप कसं असेल, कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदं याबाबत चर्चा सुरु आहे.राष्ट्रवादीने दिलेल्या ५०-५० फॉर्म्युल्यावर काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली