उठसूट कोणीही कुत्रं उठतं आणि म्हणतं मी अयोध्येला जाणार- निलेश राणे

0
2190

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – उठसूट कोणीही कुत्रं उठतं आणि म्हणतं मी अयोध्येला जाणार अशा शब्दात टीका करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मंदिर प्रश्न आम्हीच सोडवू त्यासाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. याच घोषणेचा निलेश राणे यांनी तिखट शब्दात समाचार घेतला आणि कोणीही कुत्रं उठतं आणि अयोध्येला जाणार म्हणतं असे म्हणत पातळी सोडून टीका केली.

एवढेच नाही तर २०१९ मध्ये छोट्या पक्षांना महत्त्व येणार आहे. मागील काही दिवसांपासून राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे एकीकडे अध्यादेश काढायची मागणीही होते आहे. अशात आता निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून टीका केली आहे. यावेळी स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना अजून त्यांच्या वडिलांचे अर्थात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधता आलेले नाही आणि ते राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत. जो माणूस कधी पंढरपूरला, शिर्डीला गेला नाही असा माणूस म्हणतोय मी अयोध्येला जाणार. अयोध्येत जात असाल तर कायमचे तिथेच जा असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.

सध्या राम मंदिराचा प्रश्न देशभरात चांगलाच गाजतोय. सुप्रीम कोर्टाने सोमवारीच या प्रश्नी जी सुनावणी आहे ती जानेवारी महिन्यात होईल असे स्पष्ट केले. ज्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही याप्रश्नावर टीका केली. निवडणुका जवळ आल्या की भाजपाला राम मंदिराची आठवण येते असे त्यांनी म्हटले आहे. तर राम मंदिर प्रश्नी कायदेशीर मार्गाने तोडगा निघाला नाही तर आमच्याकडे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत असं वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. अशात काही दिवसांपूर्वीच शिवसेनेशिवाय हे मंदिर पूर्ण होऊ शकत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. याच अयोध्या दौऱ्यावर निलेश राणेंनी टीका केली आहे.