उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी केले हात साफ आणि….

0
397

चिखली, दि. १४ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने चाळीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी आठ ते अकरा या कालावधीत ओमसाई हाउसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली येथे घडली.

सरिता प्रकाश थोरे (वय 22, रा. ओमसाई हाउसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी सकाळी आठ ते अकरा वाजताच्या कालावधीत उघडे होते. उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात लाॅक नसलेल्या लाॅकरमधून फिर्यादी यांचे वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि वीस हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे फुल असा एकूण 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.