“ईडीची नोटीस ‘त्या’ हेतूने प्रेरित, हे सर्वांनाच माहीत”

0
183

मुंबई,दि.२८(पीसीबी) – ईडीची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून आता आदित्य ठाकरे यांनी हि प्रतिक्रिया दिली.

राजकीय आकसापोटील या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे असंही मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल.

दरम्यान अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने वर्षा यांना 29 डिसेंबर रोडी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत