मेसेज करून पाठलाग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

0
231

पिंपरी, दि.28 (पीसीबी) : महिलेला व्हाट्सअप आणि टेक्स्ट मेसेज केले. तसेच तिच्याशी जवळीक साधण्यासाठी गुप्तपणे पाठलाग केला. ही घटना 11 ते 25 डिसेंबर या कालावधीत सीओडी मेस, देहूरोड येथे घडली.

याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 8263937540 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईल क्रमांक धारकाने फिर्यादी पीडित महिलेला व्हाट्सअप आणि टेक्स्ट मेसेज केले. कोणतीही ओळख नसताना विनाकारण जवळीक साधण्यासाठी मेसेज पाठवून महिलेचा गुप्तपणे पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.