भोसरी, हिंजवडीमध्ये वाहन चोरीचे सत्र सुरुच…

0
459

भोसरी, दि. 28 (पीसीबी) : भोसरी परिसरातून रॉयल इन्फिल्ड बुलेट, होंडा ऍक्टिवा तर हिंजवडी मधून टीव्हीएस ज्युपिटर ही दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. तर वाकड परिसरातून वोल्क्सवॅगन कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत रविवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

निलेश विनायक गंगावणे (वय 28, रा. आदर्शनगर, भोसरी) यांची 35 हजार रुपये किमतीची रॉयल इन्फिल्ड बुलेट (एम एच 14 / जी एक्स 0109) अज्ञात चोरट्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालय येथून चोरून नेली. हा प्रकार 24 डिसेंबर रोजी दुपारी अडीच ते सव्वातीन या कालावधीत घडला. याबाबत गंगावणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रेवणसिद्धप्पा बसवप्पा गोबूर (वय 50, रा. जय महाराष्ट्र चौक, भोसरी) यांची 35 हजार रुपये किमतीची होंडा ऍक्टिवा (एम एच 14 / एच टी 7882) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना 21 डिसेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास घडली. याबाबत गोबूर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनीष मनबहादूर थापा (वय 22, रा. देशमुखवाडी, पुणे) यांची 50 हजार रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (एम एच 12 / आर यु 7876) अज्ञात चोरट्यांनी बावधन येथील भूगाव रोडवरील चौपाटी जवळून चोरून नेली. याबाबत थापा यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात प्रतीक मोहन लांडगे (वय 25, रा. काळेवाडी) यांनी कार चोरीची फिर्याद दिली आहे. लांडगे यांची दोन लाख रुपये किमतीची वोल्क्सवॅगन कार (एम एच 14 / डी एफ 7572) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.