“इस्लामिक राजवटीत हिंदू, शीख, बौद्ध यांच्या नरसंहाराला मान्यता देण्याची गरज

0
414

बंगळूर, दि. २३ (पीसीबी) : बंगळूरमधील एका प्रवाशाला रेल्वेने प्रवास करताना अनाधिकृत प्रकाशनाचे वर्तमानपत्र आढळले आहे. त्यामध्ये वादग्रस्त लेख आढळले असून ही घटना शुक्रवारी शताब्दी एक्सप्रेसमध्ये घडली असून त्यासंदर्भात IRCTCने संबंधित पेपर विक्रेत्या परवानाधारकाला आदेश दिले आहेत.

रेल्वेत आढळलेले हे प्रकाशन बंगळूर येथील आहे. आर्यवर्त एक्सप्रेस नावाच्या या वर्तमानपत्राने त्याच्या मुख्य पानावर “इस्लामिक राजवटीत हिंदू, शीख, बौद्ध यांच्या नरसंहाराला मान्यता देण्याची गरज आहे” अशा आशयाची हेडींग असलेला लेख छापला असून त्यामध्ये UN ने औरंगजेबाला हिटलरप्रमाणे नरसंहार घडवणारा म्हणून घोषित करावे अशाही आशयाचे वादग्रस्त लेख आढळून आले आहेत. दरम्यान ट्रेनमध्ये पेपर विकणारा परवानानाधारक पीके शेफी यांनी इंडियन एक्सप्रेसला बोलताना सांगितलं की, विक्रेत्याने मंजूर केलेल्या वर्तमानपत्रामध्ये परिशिष्ट म्हणून हा पेपर प्रसारित केला गेला. पण त्यासंदर्भात एका प्रवाशाने ट्वीट करत त्यासंदर्भात माहिती दिली आहे.

“पेपर वाटण्यासाठी आमच्याकडे मुलं असतात, तेव्हा पेपर वाटताना ते छापलेल्या बातम्यांकडे आणि लेखांकडे लक्ष देत नसतात. मी त्यांना अशा प्रकारच्या पुरवण्या न वाटण्यास सांगितलं असून तसेच फक्त मुख्य पुरवणी वाटण्याच्या सूचना दिल्या आहेत असं शेफी बोलताना म्हणाले.

“त्याप्रकरणी आम्ही संबंधित वितरकाला आणि परवानाधारकाला फक्त डेक्कन हेराल्ड आणि कन्नड वर्तमानपत्र वाटण्याची परवानगी दिली आहे. त्या सूचनांचं संबंधित वितरकाने पालन करण्याचे आदेश आयआरसीटीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक रजनी हसीझा यांनी सांगितलं.

दरम्यान याप्रकरणी गोपीका बाशी या प्रवाश्याने ट्वीट करत ही माहिती दिली होती. तीने संबंधित वर्तमानपत्राचा फोटो ट्वीट करत म्हटलं आहे की, “मी सकाळी बंगळूर चेन्नई शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करत असताना मला प्रत्येक आसनावर वादग्रस्त आशयाचे हेडिंग असलेले वर्तमानपत्र आढळले आहे. आर्यवर्त एक्सप्रेस असं या वर्तमानपत्राचे नाव असून IRCTC अशा वर्तमानपत्राला कशी परवानगी देऊ शकते.” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.