इथे बापाचे नाव नाही तर काम चालते; विवेकची राहुल गांधींवर बोचरी टीका

0
342

मंबई, दि. २३ (पीसीबी) – इथे बापाचे नाव नाही तर काम चालते, असे म्हणत अभिनेता आणि भाजप समर्थक विवेक ओबेरॉय याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तो एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.

लोकसभा निवडणुकांचे कल हाती येत असून यात भाजपला मोठे यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विवेक ओबेरॉय हे वक्तव्य केले आहे.

राहुल गांधीचा चित्रपट फ्लॉप झाला आहे. नरेंद्र मोदी देशाचे हिरो ठरले आहेत, असेही म्हणाला आहे.