इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या दारूभट्टीवर चाकण पोलिसांचा छापा

0
413

चाकण, दि. १७ (पीसीबी) – चाकण पोलिसांनी मोई गावात इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर छापा टाकला. त्यात दारू बनविण्याचे एक हजार लिटर रसायन आणि अन्य साहित्य पोलिसांनी नष्ट केले. ही कारवाई मंगळवारी (दि. १५) दुपारी दीड वाजता केली.

गणपत जयसिंग राठोड (वय ५०, रा. फलके वस्ती, मोई, ता. चाकण) याच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याने मोई गावात इंद्रायणी नदीच्या काठावर दारूभट्टी लावली होती. त्याबाबत चाकण पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी दारूभट्टीवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी गणपत राठोड इंद्रायणी नदीत उडी मारून चिखलीच्या बाजूला पळून गेला. पोलिसांनी दारू बनविण्याचे एक हजार लिटर कच्चे रसायन आणि अन्य साहित्य नष्ट केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

शिरगाव पोलिसांनी दारू विक्री करणा-या व्यक्तीकडून १० लिटर दारू जप्त केली

दारुंब्रे गावात दारू विक्री करत असलेल्या एका व्यक्तीकडून शिरगाव पोलिसांनी एक हजार रुपयांची १० लिटर दारू जप्त केली. प्रदीप दौलतराव शिनगारे (वय ३२, रा. शिरगाव, ता. मावळ) असे दारू विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.