ओटास्कीम येथे कल्याण मटका जुगार अड्ड्यावर निगडी पोलिसांचा छापा

0
588

निगडी, दि. १७ (पीसीबी) – ओटास्कीम येथे कल्याण मटका आणि पत्त्यांचा जुगार अड्डा चालवणा-या एकावर निगडी पोलिसांनी कारवाई केली. जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली. आण्णा मारुती धोत्रे (वय ४८, रा. ओटास्कीम, निगडी) असे जुगार अड्डा चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शंकर भागुजी बांगर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आण्णा धोत्रे हा ओटास्कीम येथे कल्याण मटका आणि पत्त्यांचा जुगार अड्डा चालवत होता. निगडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी जुगार अड्ड्यावर बुधवारी (दि. १६) छापा मारला. त्यात पोलिसांनी जुगार अड्डा चालक धोत्रे याच्यावर कारवाई केली.

जुगार अड्ड्यावर कारवाई करताना काही नागरिक तिथे जुगार खेळत होते. पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण पळून गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.