इंद्रायणीनगर येथील शासकीय वसतीगृह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून विद्यार्थी जखमी

0
558

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – इंद्रायणीनगर भोसरी येथील आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वसतीगृहात राहणारा एक तरूण इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि.३) रात्री उशीरा दीडच्या सुमारास घडली. 

अमित गणपत वळवी (वय २५, रा. कालीबेल, नंदूरबार) असे जखमी विद्याथ्याचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, इंद्रायणीनगर येथील आदिवासी वसतीगृहात एकूण २४३ विद्यार्थी राहतात. अमित देखील तेथेच राहतो. तो पिंपरी गावातील महाविद्यालयात भूगोल विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी तो या वसतिगृहात आला होता. वसतीगृहात अनेक समस्यांना तो तोंड देत होता. सोमवारी तो रात्री दीडच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या घरची हालाकीची परस्थिती आहे. त्यावर भोसरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.