इंद्रायणीनगर प्रभागातील सेक्टर क्रमांक ६ नवरात्र ग्राउंड, जलवायू विहार परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण; सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा

0
635

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर क्रमांक ६ नवरात्र ग्राउंड, जलवायू विहार परिसरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. या भागातील रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण न केल्याने नागरिकांना रहदारी करताना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी गुरूविहार कॉलनीतील अंतर्गत सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिकेने या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये सेक्टर क्रमांक ६ नवरात्र ग्राउंड, जलवायू विहार परिसरात हजारो नागरिक वास्तव्याला आहेत. या भागातील अंतर्गत रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना चालताना किंवा वाहनांमधून जाताना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. रस्त्यांवरील डांबरीकरण उखडून खडी बाहेर आले होते. त्यामुळे वाहनांना अपघात होण्याचा धोकाही होता. नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांनी गुरूविहार कॉलनीतील सर्व रस्त्यांचे चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला.

सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त तसेच स्थापत्य विभागाकडे पाठपुरावा करून महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सेक्टर क्रमांक ६ नवरात्र ग्राउंड, जलवायू विहार परिसरातील अंतर्गत सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी खर्चाची तरतूद करून घेतली. हे काम प्रत्यक्षात सुरू व्हावे यासाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर आणून या रस्त्यांची पाहणी करायला लावली.

या सर्वांच्या प्रयत्नामुळे आता सेक्टर क्रमांक ६ नवरात्र ग्राउंड, जलवायू विहार परिसरातील अंतर्गत सर्व रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. रस्ते डांबरीकरणाचे हे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे सेक्टर क्रमांक ६ नवरात्र ग्राउंड, जलवायू विहार परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहेत. कॉलनीतील सर्व नागरिकांना महापालिकेच्या वतीने विविध मुलभूत सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांनी सांगितले.